परभणी प्रतिनिधी- स्मृतिशेष मल्हारराव मनवर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी शहरातील आय.टी.आय. कॉर्नर, डॉ. आंबेडकर नगर येथील रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहाला स्वरा संगीत अकॅडमी च्यावतीने ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ विश्वरत्न, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच वसतिगृहातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना फळ स्वरूपात केळी व सफरचंद चे वाटप करून अभिवादन करण्यात आले.
कालवश मल्हारराव मनवर यांच्या तृतीय स्मृतिदिना निमित्त प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी 5 सप्टेंबर ला सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. राजकुमार मनवर यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची रंगीत प्रतिमा माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे यांना देण्यात आली. या कार्यक्रमाला स्वरा संगीत अकॅडमीचे डायरेक्टर प्रा. राजकुमार मनवर, संचालिका डॉ. ललिता क्षिरसाठ, माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, डॉ. क्षिरसाठ, स्वरा क्षिरसाठ, शेख अझहर, शेख कलीम, सुरेश शेळके, शिवाजी खंदारे, प्रकाश वडधुतीकर, प्रियंका अंभोरे, विनोद वाडेकर, सिद्धार्थ गायकवाड व वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

