सत्ताधारी पक्षाला घाबरून महसूल अधिकाऱ्यांनी केली संविधानिक पद्धतीने जागेची मंजुरी.
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज- दिनांक ०८/०८/ २०२४ ला तहसील कार्यालय चंद्रपूर यांच्या कार्यालयातून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता जो लोक कल्याणकारी संस्था घुग्घुस मौजा घुग्घुस येथील सर्व्हे क्र.१७ मधील एकूण आराजी ०.४३ हे आर जागा संस्थेचे वाचनाल्याकरिता भाडेपट्ट्याने मिळावे यासाठी केला होता त्यावर आक्षेप असल्यास दिनांक ३०/०८/२०२४ पर्यंत मागविण्यात आले होते परंतु महोदय हा जाहीरनामा घुग्घुस येथील नगरपरिषद कार्यालयाद्वारे दिनांक ३०/०८/२०२३ ला प्रसिद्ध करण्यात आला तर नागरिकांना आक्षेप असल्यास ते त्याच दिवशी कसे काय आक्षेप नोंदवतील हा मुख्य प्रश्न निर्माण होतो व हे सर्व घुग्घुस येथील नगरपरिषद कार्यालयाकडून जाणीवपूर्वक केलं जेणेकरून नागरिकांकडून कुठल्याही प्रकारचा आक्षेप लिखित स्वरूपात यावा नाही, यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे व या जमीन मिळकतीवर स्थगिती आणण्यात यावी
जवळ जवळ २४ वर्षांपूर्वी घुग्घुस येथील सर्व अपंग लोकांच्या संस्थेने या जागेची मागणी केली होती परंतु त्यांनी ही जागा न देता तात्काडीने मागणी केलेल्या संस्थेला कसं काय प्रशासन जागा देत आहे यावर सुद्धा प्रश्न उद्भवत आहे.याकरिता आपणास आम आदमी पार्टी द्वारे निवेदन व आक्षेप सादर करीत आहे.
यावेळेस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे , युवा अध्यक्ष सचिन सिरसागर, सचिव संदीप पथाडे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

