ऋषीपंचमीच्या दिवशी साजरा होणाऱ्या माऊली संत गजानन महाराज सोहळ्याचा हजारो भाविक लाभ घेणार.

0
111

शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम- कारंजा (लाड) सद्य परिस्थितीमध्ये केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात श्रीक्षेत्र शेगाव निवासी संत श्री गजानन महाराजांचे लाखो करोडो अनुयायी आहेत. संत गजानन महाराजांनी आपल्या भक्तांना, अन्न हे परब्रम्ह जाणून, अन्नाची नासाडी न होऊ देता त्याचे महत्व जाणून अन्नदान – परोपकार व नि:स्पृह सेवेचा महामंत्र ‘गण गणात बोते’ असा दिला.त्यामुळे आज त्यांचे हजारो भाविक भक्त त्यांच्या आज्ञेचे पालन करून, समाजामध्ये निष्काम सेवा आणि अन्नदान करीत असतात.कारंजा नगरी मध्ये प्रत्येक मोहल्ले कॉलेनी मध्ये माऊली संत गजानन महाराजाची शेकडो लहानमोठी मंदिरे असून,रविवार भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषी पंचमी) चे दिवशी प्रत्येक मंदिरामध्ये दि. 08 सप्टेंबर 2024 रोजी,दुग्धाभिषेक,भजन, किर्तन,पारायण,महाप्रसादाचे कार्यक्रम होणार आहेत.
कारंजा नगरीमध्ये,स्थानिक ऐतिहासिक व पुरातन असलेल्या श्री.कामाक्षा देवी संस्थान समोर असलेल्या शहर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्येही संत गजानन महाराजाचे जागृत असलेले शहरातील पहिले पुरातन असे मंदिर आहे. या मंदिरामध्ये निष्काम सेवाधारी असलेले महाराजांचे भक्त मंडळी निष्काम सेवाधारी म्हणून अहोरात्र सेवा देत असतात. येथे दर गुरुवारी व एकादशीला सायंकालीन महाआरती नंतर, भाविकांच्या स्वेच्छेने मिळालेल्या लोकवर्गणीमधून भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम साजरा केला जातो.आणि हजारो भाविक शेगाव संस्थानची अनुभूती घेऊन तृप्त होऊन जातात.अशा शहर पोलीस स्टेशन परिसरातील संत गजानन महाराज मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे येत्या रविवारी प्रातःकाली महाराजांचा अभिषेक,दुपारी महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे,तरी इच्छुक माऊली भक्तांनी ऋषीपंचमी व पुढे दर गुरुवारी होत असलेल्या महाप्रसादा (अन्नदाना) करीता, स्वेच्छेने देणगी किंवा महाप्रसादाला लागणारे अन्नधान्य,गहू,दाळ,साखर, तेलडबा,भाजीपाला वगैरे सहकार्य मंदिरामध्ये आणून द्यावे. असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here