वीज निर्मिती उपोषणकर्त्या कंत्राटी कामगार लहुजी मरसकोल्हे यांची प्रकृती बिघडली

0
411

सामाजिक कार्यकर्ते अरुण कांबळे आमरण उपोषण बसले…

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर-महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती च्या माध्यमातून महाराष्ट्रातील अंदाजे 16 हजार कंत्राटी कामगार बंधू-भगिनीं च्या जिव्हाळ्याच्या प्रमुख 9 मागण्याला घेऊन दिनांक 01/08/2024 ला पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनाच्या अनुषंगाने आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दिनांक 16/08/2024 ला महाराष्ट्रातील सर्व पॉवर स्टेशनच्या गेटवर द्वार सभा घेण्यात आली. द्वितीय टप्प्यामध्ये संविधान चौक नागपूर येथे महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दिनांक 17,18,19 रोजी साखळी उपोषण , तिसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक 20 /8/ 2024 पासून आमरण उपोषण, चौथा टप्प्यामध्ये दिनांक 22/08 /2024 रोजी मेजर गेट येथे मीटिंग घेऊन 23/0 8 /2024 रोजी सर्व पावर स्टेशन मध्ये महानिर्मितीमधील कंत्राटी कामगारांचे एक दिवसीय टूल डाउन आंदोलन करण्यात आले. तसेच पाचव्या टप्प्यामध्ये दिनांक 24/08/2024 पासून महाराष्ट्र सर्व पॉवर स्टेशन समोर महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त समिती च्या माध्यमातून कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून दिनांक 31/0 8 /2024 ला चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र येथील उपोषण करते हेरमन जोसेफ यांची प्रकृती हलवल्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे भरती करण्यात आले व त्यांच्या ठिकाणी लहुजी मरसकोल्हे यांनी सतत पाच दिवस आमरण उपोषण केले व त्यांची प्रकृती हलवल्यामुळे त्यांना दिनांक 04 /09/ 2024 ला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले. व त्यांच्या ठिकाणी आज दिनांक 05/09/2024 ला रात्र झिरो झिरो पासून माननीय अरुण कांबळे हे आमरण उपोषणा करीता बसलेले असून त्यांनी स्व इच्छेने हा निर्णय घेतलेला असून कृती समितीस लेखी स्वरुपात पत्र दिलेले आहे. करिता अरुण भाऊ कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन माननीय भाई सदानंद पी. देवगडे,अध्यक्ष, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती, यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमास माननीय बंडूभाऊ हजारे , माननीय प्रमोद भाऊ कोलारकर, माननीय अमोल भाऊ मेश्राम, माननीय वामन बुटले, माननीय वामन मानकर, माननीय युवराज मेंद, माननीय बंडू मडावी, माननीय हेरमन जोसेफ, माननीय सुधाकरजी तेलसे, माननीय नीताई घोष, माननीय सचिन कार्लेकर,माननीय सुभाष सिंग बावरे, माननीय रवी पवार,प्रेमभाऊ भोई, रोशनभाऊ जोंधळे, अमरदास भेंडारकर, विनीत बेंडले तसेच महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर आंदोलन माननीय ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तसेच महानिर्मिती शासन व प्रशासनासोबत बैठक लागून महानिर्मितीमधील कंत्राटी कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रमुख नव मागण्याची सोडवणूक होईपर्यंत आंदोलन सतत चालू राहील अशी ग्वाही उपोषण करते माननीय अरुण भाऊ कांबळे तसेच चंद्रपूर महा औष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष,भाई सदानंद पी. देवगडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here