
कोरची प्रतिनिधी – डॉ. शिलू चिमुरकर यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रेला आजपासून पासून सुरवात करण्यात आली..
मौजा. दोडके ता. कोरची या गावापासून या यात्रेला सुरुवात कारण्यात आली. या वेळी डॉ. शिलूताई चिमुरकर यांनी सामान्य लोकांशी परस्पर संवाद साधत त्याच्या येणाऱ्या वैक्तिक, आणि सार्वत्रिक समस्या जाणून घेतल्या,या जनसंवाद यात्रेत दोडके गावातील सरपंच, उपसरपंच, तथा या गावातील प्रतिष्ठित नागरिक, बऱ्याच संख्येने उपस्थित होते,तसेच काँग्रेस कार्यकर्ते टिकारामजी सहारे जेष्ठ कार्यकर्ते काँग्रेस कमेटी,मा. महादेव कुमरे अद्यक्ष आदिवासी संघटना वडसा काँग्रेस कमेटी, लीलाधरजी भर्रे युवा नेते काँग्रेस कमेटी वडसा ,गीता नाकाडे, वैष्णवी आकरे,देवका शेंद्रे,भागेश्वर आळे,आसारामजी बाळबुद्धे,कृष्णा उईके,गोंडणे, सदाशिव चिंचेकर,बंडू शेंद्रे, देवा सहारे आदी उपस्थित होते.














