सुदृढ आरोग्य हेच खरे जीवनाचे सारस्य- आमदार कृष्णा गजबे..

0
53


देसाईगंज येथील श्री. साई बाबा मंदिर सभागृहात मोफत आरोग्य शिबिर संपन्न..

देसाईगंज प्रतिनिधी:-दिनांक: १० सप्टेंबर २०२४ देसाईगंज शहराच्या श्री साई बाबा मंदिर सभागृहात आज १० सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोफत आरोग्य शिबीर प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी हजेरी लावली होती. प्रसंगी गजबे यांनी नागरिकांना संबोधित करतांना म्हटले की,
प्रत्येकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सुदृढ आरोग्य हेच खरे जीवनाचे सारस्य आहे. मोफत आरोग्य शिबिरे घेण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे गोर-गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना पावसाच्या दिवसात तसेच इतर दिवसांमध्ये आरोग्य विषयक समस्या नेहमी भेडसावत असतात; अशातच बरेच नागरिक पैस्याभवी उपचार घेऊ शकत नाहीत; त्यामुळे आरोग्य शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची सेवा करण्याचे काम श्री साई गणेश उत्सव मंडळ हे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य शिबिरात नेल्सन हॉस्पिटल नागपूर, सृष्टी डोळ्यांचा दवाखाना यांच्या मार्फत तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे मोफत बी. पी., शुगर, डोळ्यांची तपासणी, मोफत चष्मे वाटप, इसिजी व इतर आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रसंगी सदर शिबिरास आमदार कृष्णा गजबे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख किसनजी नागदेवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी जेठाणी, माजी नगराध्यक्ष शालुताई दंडवते, लोकमतचे प्रतिनिधी पुरुषोत्तमजी भागडकर सर, डॉ.खंडेलवार, नरेशजी विट्टलानी, दुबेजी महाराज, दीपकजी झरकर, बबलूजी विधाते, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नेल्सन हॉस्पिटल नागपूरचे डॉ.मोहित ठाकरे, डॉ.दीक्षा जुंबळे, डॉ.प्रणय पचगडे, डॉ.नितेश टिकले सह नेल्सन हॉस्पिटल नागपूरचे आरोग्य कर्मचारी, डॉ.सुनील कुडके, सचिन निमजे, भूमिका नीमजे यांनी आरोग्य शिबिराची धुरा सांभाळली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here