आरमोरी प्रतिनिधी – दिं.१० सप्टेंबर २०२४ -आरमोरी शहरातील भाजपा तालुकाध्यक्ष पंकजभाऊ खरवडे व भाजयुमोचे जिल्हा महामंत्री भारतभाऊ बावणथडे यांनी श्री.गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती या निमित्ताने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांनी दर्शन घेत गणपती बाप्पा सर्वांना सुख, समृद्धी,ऐश्वर्य, शांती, आरोग्य देवो हीच बाप्पाच्या चरणी नतमस्तक मनोकामना करत प्रार्थना केली..
यावेळी प्रामुख्याने भाजपाचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा सचिव नंदू पेठेवार, माजी नगराध्यक्ष पवन नारन्नवरे, शहराध्यक्ष विलासजी पारधी, भाजपा युवा नेते अक्षय हेमके,मनोज पांचलवार, भाजपा युवा नेते विकास पायदलवार,तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मा.खा.अशोक नेते यांनी भगवती राईस मिल मुरखडा येथील गणपती बाप्पाचे घेतले दर्शन
गडचिरोली मुरखडा येथील भगवती राईस मिलचे मालक नंदकिशोर सारडा व भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांनी श्री.गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती या निमित्ताने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी दर्शन घेत गणपती बाप्पा सर्वांना सुख, समृद्धी,ऐश्वर्य , शांती, आरोग्य देवो हीच बाप्पाच्या चरणी नतमस्तक मनोकामना करत प्रार्थना केली..

