
तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास जणआंदोलन करू : तब्बसूम शेख
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर- दि.१३/९ रोजी चंद्रपूर शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडलेले असून, त्याचा प्रवासी व वाहतूक व्यवस्थेवर अतिशय नकारात्मक परिणाम होत आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात याबाबत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
खड्डेमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे आणि अनेकांना गंभीर दुखापतीसुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालेला आहे.
सध्या गणेश उत्सव जोमाने सुरु असून विसर्जन रॅली मध्ये सुद्दा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे परिस्थितीची जाणीव करून तसेच त्वरित लक्ष देऊन, रस्त्यांची दुरुस्ती करून शहर खड्डेमुक्त करावे, अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा महिला अध्यक्षा तब्बसूम शेख यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे..
यावेळेस आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे महिला महानगर अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख, मनीष राऊत, अनुप तेलतुबडे, अयुब शेख, नजमा बेग इत्यादी उपस्थित होते.














