आपले विरुद्ध होणाऱ्या आंदोलनाचा तीव्र निषेध

0
55

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, पुणे – भारतीय जनता पार्टीच्या संविधान पायदळी तुडविण्याच्या एक दशकाच्या कालखंडात आपण निर्भयपणे वैचारिक पद्धतीने प्रगल्भरीत्या संविधानाच्या बाजूने लढत आहात यासाठी आम्हाला आपला अभिमान वाटतो. संविधान बचाव आणि फुले, शाहू, गांधी- आंबेडकर विचारांची बेरीज करून समाज एकसंध राहण्यासाठी अहिंसक लोकशाहीच्या मार्गाने आपण करीत असलेले प्रयत्न प्रचंड मोठे आहेत.
मा. महोदय, “या देशात समता येण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. समता प्रस्थापित झाल्यानंतर आरक्षणाची गरज राहणार नाही. सर्व जनता सुखी होईल त्यावेळी आरक्षण काढू!” अशा पद्धतीचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले असताना त्या वक्तव्याचा विपर्यास आंबेडकरी चळवळीतील पक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून केला जात आहे, ही दुःखद बाब आहे.
सन १९९९ ते २०२४ या कालखंडात अनेकदा आरक्षण या कुबड्या आहेत, त्या फेकून दिल्या पाहिजेत, असे वक्तव्य विश्ववंदनीय परमपूज्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा केले आहे. शाळेच्या दाखल्यावरून जात नष्ट करावी, अशा पद्धतीची भूमिका देखील त्यांनी मार्च २०१३ साली जाहिररित्या मांडली होती. त्याचप्रमाणे भाजप आणि आरएसएसला आरक्षण आणि संविधान दोन्हीही संपवायचे आहे अशा आशयाची अनेक भाषणे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहेत, त्यासंबंधीचे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक देखील उपलब्ध आहेत.
असिमजी, आपण संविधान बदलणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात उभे आहात, त्याचप्रमाणे संविधान भक्कम होण्यासाठी आपण मोलाचे प्रयत्न करीत आहात. आपण संविधानवादी- आरक्षणवादी असल्यामुळे आम्ही रुग्ण हक्क परिषद, महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीने नेहमीच आपल्या कार्याला शुभेच्छा देत पाठिंबा व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडी आपल्या विरुद्ध घेत असलेली आंदोलनासारखी भूमिका अनाकलनीय आहे. संबंधित आंदोलनाचा आम्ही अत्यंत तीव्र भावनेने निषेध व्यक्त करत आहोत. असीम, आपण स्वतःचे मनोबल वाढवावे. आपले मौलिक कार्य यापुढे देखील सुरूच ठेवावे.
या करिता ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री तथा गृह, विधी व न्याय मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
सदर पाठिंब्याचे पत्र देत असताना उमेश चव्हाण, ऍड. असीम सरोदे, मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड आणि विश्वंभर चौधरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here