परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – रमाई घरकुल योजनेत अडीच लाखावरून पाच लाख रुपये अनुदान करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्य शासनाने मागासवर्गीयासाठी रमाई घरकुल योजना ही जाहीर करून या रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले असून त्यामध्ये कुठल्याच प्रकारचे बांधकाम होत नाही जवळपास राज्यातील बऱ्याच लोकांचे म्हणजे 90 टक्के लाभार्थ्यांचे बांधकामे अपूर्ण असून त्यातही काही नगरपालिका दोन लाख 31 हजार पाचशे रुपये अनुदान देत असून उर्वरित रक्कम बांधकाम परवाना लाभार्थ्याचा सहभाग इत्यादी च्या नावाखाली कपात करून घेत असल्यामुळे लाभार्थ्यांची खूप हेळसांड होत काहींना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे त्यासाठी रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अडीच लाखावरून पाच लाख रुपये अनुदान करण्यात यावे व पूर्ण पाच लाख रुपये देण्यात यावे असे लेखी निवेदन ही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड यांनाही देण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केली आहे.

