वणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी स्पर्धेसह विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अभय पारखी होते त्यांनी हिंदी भाषेचा गौरवशाली ईतीहास व हिंदी दिवसाचे महत्व सांगुन मार्गदर्शन केले.प्रस्तावना सौ.अनिता टोंगे यांनी,संचालन गंगारेड्डी बोडखे यांनी तर आभार प्रदर्शन श्रेया धोबे यांनी केले.शेवटी विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणुन चॉकलेट, बिस्कीट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रतिश लखमापुरे, राजेंद्र देवतळे,सुनिल गेडाम, हरीष बोढाले,हरीष वासेकर,जितेंद्र डगावकर यांनी अथक प्रयत्न केले.

