गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे सदतिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवयित्री सौ. शैला चंद्रकांत चिमड्यालवार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “गौतम बुद्ध” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
सौ . शैला चंद्रकांत चिमड्यालवार या सावली (जिल्हा चंद्रपूर) येथील रहिवासी असून नवोदित कवी आहेत. ५० च्या वर कवितांचे लेखन त्यांनी केले आहे. कविता क्षेत्रात अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या सदतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने राजेंद्र सोनटक्के, संतोष कपाले, वंदना सोरते, प्रा. पंढरी बनसोडे, रोहिणी पराडकर, पुनाजी कोटरंगे, वामनदादा गेडाम, अजय राऊत, गजानन गेडाम, चरणदास वैरागडे, संगीता रामटेके, उकंडराव नारायण राऊत, लता शेंद्रे, तुळशीराम उंदीरवाडे, संगीता ठलाल, कृष्णा कुंभारे, सौ. प्रिती ईश्वर चहांदे, नरेंद्र गुंडेली, सुभाष धाराशिवकर, मुरलीधर खोटेले, ज्योती म्हस्के, सुरेश गेडाम,पुरुषोत्तम दहिकर, गणेश रामदास निकम,माधुरी अमृतकर, मिलींद खोब्रागडे,वसंत चापले, सुनील चडगुलवार, शैला चिमड्यालवार, खुशाल म्हशाखेत्री, सुजाता अवचट,केवळ बगमारे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

