मैदानी खेळामुळे युवकांचा उत्साह वाढतो- मा.खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन..

0
75

जय गुरुदेव स्पोर्टिंग क्लब, कृष्णनगर ता.चामोर्शी द्वारा ग्रामीण स्तरीय फुटबॉल प्रतियोगिता..

चामोर्शी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज- आज दिं. १७ सप्टेंबर २०२४ चामोर्शी तालुक्यातील कृष्णनगर येथे गुरुदेव स्पोर्टिंग क्लब च्या वतीने ग्रामीण स्तरीय फुटबॉल प्रतियोगिता चे आयोजन करण्यात आले होते.

या फुटबॉल प्रतियोगिताच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी बोलतांना युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी आजच्या काळी मैदानी खेळ खेळने गरजेचे आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते.आठ दहा दिवस सतत फुटबॉल हा खेळ चालतोय यात वादविवाद न करता पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळ खेळावे.आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त खेळाचे उद्घाटन झाले. यासाठी या फुटबॉल प्रतियोगितेच्या खेळाला शुभेच्छा देतोय.असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी माजी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

यावेळी फुटबॉल प्रतियोगितेच्या कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने जिल्हा महामंत्री प्रकाश जी गेडाम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा‌ आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंद नरोटे,सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,सामाजिक नेते रतन सरकार, सरपंच प्रभाश सरकार, विष्णु चतुर्वेदी, हृदय बाला,प्रदिप मंडल,उत्पल बारई,सुमंत दास,गौतम तरफदार, विशाल मुजुमदार, तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक व खेळाडू तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here