अखंड भारतील असंख्य दलितांची 12 ऑक्टोंबर 2024 रोजी नागपूरला धम्मदिक्षा कार्यक्रम

0
100

 प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज- बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी या भारत खंडाचा मोहंदो जडो सुसंस्कृत सारखा आदर्श लाभलेला सनातन बौध्द धर्माचा पुनरुत्थान करुन त्या सोबत २२ प्रतिज्ञा देवुन मजबुत भिमाचा किल्ला बांधला आणि राजकारण कायमचे सोडुन धम्म प्रचार आणि प्रसाराला स्वतःला प्रामाणिक वाहुन घेतले…

याच २२ प्रतिज्ञाच्या पावलावर पावुल ठेवून भारतातील बुद्धाच्या सामाजिक विचाराने प्रभावित होऊन बौध्द धम्माच्या मार्गावर रोजचे रोज सामावला जात आहे.

याच मार्गावर भारतीय बौध्द महासभेचे संस्थापक श्रद्धेय धर्मप्रकाश भारतीय बौद्धजी यांनी राजनीतीला पूर्णविराम देवुन आयुष्यभर बाबासाहेब यांचे प्रमाणे तथागतांचा सनातन बौध्द धर्माचा स्वीकार करून पुन्हा २१ व्या प्रतिज्ञा प्रमाणे आज पासुन माझा नवीन जन्म झाला असे मी मानतो व बुद्ध धम्माचे नविन संस्कार प्रमाणे आपल्या सोबत दिल्ली येथीलच नाही तर अखंड भारतील असंख्य दलीत, पीडित शोषित, मजुर, कष्टकरी, गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाज्यापासून कोसो दुर फेकलेल्या भारतातील काण्या कोपऱ्यातील लाखो लोक १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी नागपुर मधील दिक्षा भूमीवर कुशिनगर येथील पुज्य भदंत महस्थाविर ज्ञानेश्वर यांचे कडून २२ प्रतिज्ञा सह बौद्ध धर्मांची धम्मदीक्षा घेणार आहे. स्वाभिमानी जीवन जगण्याचा संकल्प करणार आहे.भंते धम्म सारथी, भंते सत्यानंद आणि भिख्खू संघ धम्म देसणा देणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जपान येथील विश्वविख्यात मंक नागार्जुन सरईसुसाई यांचे नेतृत्व खाली आयोजित करण्यात आला असून आपण सर्वांनी या कार्यक्रमाचे साक्षीदार बनुन आनंदमयी, उत्साही वातावरण बनविण्या करिता महाराष्ट्रातील तमाम बौद्ध नेते मंडळी, समता सैनिक दल आणि बौध्द महासभेच्या सर्व बौद्धाचार्य आणि अनुयायी यांनी विना आमंत्रण सहकार्याची भावना ठेवून तन मन धनाने सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here