नवयुवक गणेश मंडळ दत्तनगर येथे अंधश्रद्धा निर्मूलनावर पी.एम. जाधव यांचे प्रबोधन

0
93

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर:- चंद्रपूर येथील दत्तनगरातील नवयुवक गणेश मंडळात महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी एम जाधव यांचा अंधश्रद्धा निर्मूलनांतर्गत सर्प विज्ञान व जादूटोणा विरोधी कायदा यावर प्रबोधनात्मक कार्यक्रम मंडळाचे प्रमुख महेंद्र राळे यांचे प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. पोस्टर्सच्या सहाय्याने सर्प विज्ञानावर सविस्तर माहिती देतांना सर्प दंशीत व्यक्तीवर प्रथमोपचार करून मांत्रिकाकडे नेण्याऐवजी योग्य उपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेणे अत्यावश्यक असल्याचे जाधव यांनी सांगितले. विषारी सर्प दंशीत व्यक्तीचे मंत्राने विष उतरवून दाखविणाऱ्या मांत्रिकास महाराष्ट्र ॶनिस कडून २१ लाख रुपयाचे बक्षिस असल्याचे जाधव यांनी सांगितले. जादूटोणा, भूत, भानामती करणी काढण्याचा, मंत्राने विषारी सापाचे विष उतरविण्याचा, नरबळी दिल्याने गुप्त धन मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या ढोंगी लोकांच्या फसव्या आश्वासनाला बळी पडू नका असे आवाहन या प्रसंगी जाधव यांनी केले. ढोंगी लोकांच्या तथाकथित चमत्काराबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी विज्ञान व हातचलाखीवर आधारित विविध चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण करून त्यामागील वैज्ञानिक कारण जाधव यांनी स्पष्ट करून सांगितले. या प्रसंगी सर्प विज्ञान व जादूटोणा विरोधी कायदा यावर आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर्स प्रदर्शनीचा विद्यार्थी व नागरीकांनी लाभ घेतला. पोस्टर्स प्रदर्शनीच्या आयोजनासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here