prabodhini news logo
Home चंद्रपूर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती व इतर विविध योजनेचा कामगारांनी लाभ...

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती व इतर विविध योजनेचा कामगारांनी लाभ घ्यावा – मा.देवराव कोंडेकर

0
170

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर:-महाराष्ट्र कामगार विभागाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनाचा माहे जून २०२४ च्या पगारातून ₹२५/- इतका कामगार कल्याण निधी कपात होणा -या कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता ही योजना आहे.
या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतात तर साखर कारखाने, सुतगिरणी, लहाण मोठे कारखाने, सर्व बँका, इन्शुरन्सची कंपनी, शाॅपिंग माॅल्स, वाहतूक कंपन्या, एस.टी. महामंडळ, वीज कंपनी, वीज वितरण कंपनी, बी.एस.एन.एल., एम.टी.एन.एल. दुध संघ, कापूस पणन महासंघ, गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषि उद्योग महामंडळ, सर्व वृत्तपत्रे, कुरिअर सर्विसेस, प्राथमिक शिक्षक बँक, किंवा फॅक्ट्रि अँक्ट अंतर्गत येणार्या सर्व आस्थापना, बाँम्बे शाॅप अँक्ट अंतर्गत सर्व दुकाने, द मोटर ट्रान्सपोर्ट अँक्ट अंतर्गत नोंदित आस्थापना मध्ये काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हि योजना दरवर्षी चालवत असते.
याकरिता खालीलप्रमाणे नियम अटी आहे..
फक्त कामगारांच्या पाल्यांसाठी योजना आहे.
अर्ज करण्यास मागील वर्षिच्या परीक्षेत कमित कमी ६०% आवश्यक आहेत.
९ वी पास व १० वी पासून पुढील सर्व शिक्षणाकरिता अर्ज करता येईल.
फक्त शासनामान्य अभ्यासक्रम व शासनमान्य संस्थेच्या प्रवेश घेतलेल्यांनीच अर्ज करावा.
मुक्त विद्यापीठ, बहिस्थ अभ्यासक्रम, दूरस्थ शिक्षण, अप्रेंटिशिप, स्टायपंड घेणारांनी अर्ज करु नये. *अर्ज बाद करण्यात येईल* .
अर्ज भरताना सर्व ओरिजनल, मुळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत, झेराॅक्स कागदपत्रे अपलोड केल्यास *अर्ज बाद केला जाईल.
अर्ज भरताना एकुण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी तपशिल टाकायलाच हवा. ज्यांना ग्रेड, ग्रेड पाॅइंट किंवा इतर प्रकारे गुण दिले असतील तर त्यांनी काॅलेजकडुन गुणांची टक्केवारी व गुण आणि स्वताच्या नावाच्या तपशिलासह पत्राद्वारे प्राप्त करुन ते पत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.
दिव्यांगांना ६०% गुणांची अट असणार नाही. तो विद्यार्थी फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
सदर शिष्यवृत्ती मंडळाची तरतुद व मेरिट या निकषावर दिली जाणार आहे.
अपूर्ण माहितीचा आणि चुकीची माहितीचा अर्ज online भरल्यास अर्ज बाद केला जाईल. याची जबाबदारी कामगार व त्याच्या पाल्याची आहे.
www.public.mlwb.in यावर वेब साईटवर online विहित नमुण्यातिल अर्ज भरावा लागेल.
शिष्यवृत्ती रक्कम
१० वी ते १२ वी.- ₹.२०००/-
पदवी – ₹. २५००/-
पदवीत्तोर पदवी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- ₹. ३०००/-
व्यावसायिक पदविका (डिप्लोमा) – ₹ २५००/-
व्यावसायिक पदवी – ₹. ५०००/-
पी. एच. डी. नोंदणी ₹.५०००/-
mpsc prelim उत्तीर्ण ₹. ५०००/-
UPSC Preliminary उत्तीर्ण – ₹. ८०००/-
परदेशात शिकत असेल तर ₹. ५० हजार. (परदेश शिष्यवृत्तीचा स्वतंत्र online अर्ज भरावा.)

याकरिता आवश्यक कागदपत्रे
कामगाराचा फोटो
कामगाराची जुन २०२४ ची पे स्लिप (त्यात रु. २५ कपात असायलाच हवी.)
कामगाराचे आधार कार्ड दोन्ही बाजू. पत्यासह.
विद्यार्थ्याचा फोटो
विद्यार्थ्याचे आधार कार्ड
विद्यार्थ्याची मागील वर्षाची मार्कशिट कलर ओरिजनल काॅपि.
सेमिस्टर पध्दत असेल तर मागील वर्षातील दोन सेमिस्टरचे ओरिजनल २ निकालपत्रके, जर का…? ऑनलाइन मार्कलिस्ट असेल तर त्या मार्कलिस्ट वरती कॉलेजचा सही शिक्का घेणे महत्वाचा आहे. हे दोन्ही कागदपत्र *एकाच ठिकाणी स्कॅन* करावे किंवा दोघांची एकच पिडिएफ बनवावी.
निकालपत्रावर ग्रेड किंवा ग्रेड पाॅइंट असतील तर टक्केवारीत रूपांतर केलेले तपशिलासह काॅलेजचे पत्र.
मुलाचे चालु वर्षी प्रवेश घेतलेले बोनाफाइड (२०२४-२५ असा उल्लेख असलेले)
बँक पासबुक ओरिजनल क्लियर काॅपि. त्यावरील अकाउंट नंबर व आय एफ सी कोड स्पष्ट असावा. खाते चालू असावे बंद नको
अर्जदाराचा ०२ वर्षांचा शैक्षणिक खंड असेल तर तहसीलदाराचे प्रमाणपत्र.
अर्जदार मुलगा मुलगी / दिव्यांग असेल तर त्याचे सर्टिफिकेट ओरिजनल प्रत.
कामगाराचा फाॅर्म नंबर १६ किंवा कारखान्याने दिलेले वार्षिक उत्पन्न लिहिलेले सहि शिक्यासह पत्र/ दाखला.
(फाॅर्म १६ ला एकापेक्षा जास्त कागद असतात. ते सर्व कागद एकत्र म्हणजे एकाच फाइलमध्ये पिडिएफ करुन ती पिडिएफ अपलोड करावी लागेल.)
(वरील सर्व कागदपत्रे ओरिजनल कागदाची क्लियर स्कॅन काॅपी असावीत. अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.)
याव्यतिरिक्त स्वतःच्या मनाने कोणतेही इतर कागद लावु नयेत./ अपलोड करु नयेत. अर्ज बाद करण्यात येईल.
घरातील म्हणजे कुटुंबातील सर्व मेंबरची नावे कामगाराने ऍड करावी व सर्वांना जवळील केंद्राचे ऑनलाईन सभासद करून घ्यावे. म्हणजे भविष्यात अनेक योजनांचा लाभ त्या त्या व्यक्तीस घेता येणार आहे.
ज्यांची नावे मागील वर्षी add केली असतील त्यांनी डायरेक्ट यावर्षिची membership नोंदवावी.
(सर्व कागदपत्रे ओरिजनलची स्कॅन काॅपि अपलोड करावी. झेराॅक्स अपलोड केल्यास अर्ज नामंजूर होईल.)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१/१०/ २०२४ ही आहे. कृपया आपल्या पगारातून माहे जुन २०२४ मध्ये ₹२५/- (कामगार कल्याण निधी) कपात होत असेल तर फक्त त्यांनीच फार्म भरू शकता तसेच मंडळाच्या पाठ्यपुस्तक अनुदान योजना, एम एस सी आय टी व कम्प्युटर टायपिंग फी अनुदान योजना,असहाय्य गंभीर आजार अनुदान योजना अशा विविध योजनेचा लाभ घ्यावा असे मा.देवराव कोंडेकर राज्य सहखजाणीस तथा जिल्हाध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here