प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये घुग्गुस शहरातील व मार्गावरील गावांमधील होतकरू विद्यार्थी शिक्षणाकरिता ये जा करतात. सध्या शाळा व महाविद्यालय नियमित रूपात चालू झाले असून अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे अनेक विद्यार्थी वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबतचे निवेदन श्रीमती स्मि.गो. सुतवणे विभाग नियंत्रक चंद्रपूर विभागीय कार्यालय यांना येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. पियुष. व्ही. मेश्राम यांनी दिले. नुकतेच एसटी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने दाखल झाली आहेत त्यापैकी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन योग्य प्रमाणातील गाड्या घूग्गुस चंद्रपूर मार्गावर वाढविण्यात यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली. नागपूर मार्गावरील शासकीय आयटीआय चौक, जनता कॉलेज चौक, विद्यानिकेतन चौक व साई पॉलीटेक्निक चौक या ठिकाणी विनंती थांबा देण्यात यावा असेही विनंती यावेळी करण्यात आली. यासंदर्भातील बाबींवर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन माननीय विभाग नियंत्रक यांनी दिले. यावेळी डॉ.मनीष जीवतोडे, प्रा. राकेश चव्हाण, प्रा. सुरज बोधे, प्रा. महेंद्र बेताल व इतर उपस्थित होते.

