विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत पावलेल्या चौगान येथील मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

0
143

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – घरगुती गणपतीचे विसर्जन करावयाचे असल्याने बाप्पाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यासाठी साऊंड बाॅक्स लावण्यात आले होते. त्या साऊंड बाॅक्स मधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथील निखील बाबुराव मैंद वय ३० वर्ष हा विवाहित युवक जागीच मृत पावला. मागील १ वर्षापुर्वीच त्याचे लग्न झाले होते. घरातील तरुण मुलाच्या अचानक जाण्याने त्याच्या आईवडील व पत्नीला मानसिक धक्का बसल्याने त्यांची शारीरिक प्रकृती हालावली. त्यामुळे तिघांनाही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार्थ दाखल करण्यात आले असुन उपचार सुरू आहेत.

सदर घटनेची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार* यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फतीने सदर कुटुंबियांना आवश्यक ती मदत करण्यासाठी सांगितले. व आपल्या स्वतःकडून आर्थिक मदत सुध्दा पाठवली. तेव्हा *तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी चौगान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सदर आपदग्रस्त कुटुंबियांच्या प्रकृतीची विचारपूस करीत त्यांच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

यानिमित्ताने आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कृतीतुन माणुसकीचे दर्शन घडले आहे. कुठलीही जातपात, धर्म, पंथ, पक्ष न बघता संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मदतीला ते धावून जात असतात. माणसाची सेवेतच खरे ईश्वरीय कार्य आहे असे ते मानतात.

आर्थिक मदत देतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे, सेवा सहकारी संस्था माजी अध्यक्ष अनिल पिलारे, सेवा सहकारी संस्था संचालक श्रीहरी देवगडे, सेवा सहकारी संस्था संचालक शिवाजी नखाते, प्रदीप मैंद पाटील, गोपाल बुराडे, मारोती पारधी यांच्यासह काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here