राष्ट्रीय महामार्ग व शेतक-यांच्या शेतजमिनीच्या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी
चामोर्शी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – गडचिरोली महामार्ग व शेतक-यांच्या समस्यां शासनाने तात्काळ सोडवाव्या यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजतापासून आष्टी येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आंदोलकाची प्रत्यक्ष भेट घेऊन आठ दिवसात मागण्याची पुर्तता करण्याचे आश्वासन दिल्यामूळे अर्ध्यातासात वाहतूकीचा मार्ग खुला करण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल होता.
गेल्या तिन वर्षापासून आष्टी-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे निर्माणाधीन असलेले थंडबस्त्यातील काम त्वरीत सूरू करण्यात यावे, चामोर्शी- हरणघाट रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे, चामोर्शी तालुक्यातील शेतक-यांच्या शेतजमिनी जोरजबरदस्तीने अधिग्रहन करून शेतक-यांना भूमिहीन करण्याचे प्रकार शासन व कंपन्यांनी त्वरीत थांबवावे, ज्या शेतक-यांच्या शेत जमिनी शासन व कंपन्यांनी जोरजबरदस्तीने अधिग्रहन केले आहे त्या शेतक-यांच्या कुटूंबातील एका सदस्याला प्रकल्पग्रस्त म्हणून विनाअट शासकिय नौकरीत त्वरीत घेण्यात यावे, शेतक-यांना वनहक्काचे पट्टे वितरीत करून सातबारा त्वरीत देण्यात यावे आदि मागण्यांच्या पूर्ततेसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
उपरोक्त मागण्या आठ दिवसात मार्गी लाण्याचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आठ दिवसात समस्या मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलनाचा ईशारा सुद्धा दिला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महासचिव योगेंद्र बांगरे, महासचिव राजरतन मेश्राम, महासचिव मंगलदास चापले, संगठक भिमराव शेंडे, उपाध्यक्ष जी.के. बारसिंगे, उपाध्यक्ष विलास केळझरकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, महिला नेत्या मालाताई भजगवळी, युवक आघाडी उपाध्यक्ष कवडू दुधे, शेतकरी नेते बाळू गौरकार, सतिश पाटील ताजणे, रमेश पिंपळकर,रविंद्र पिदुरकर, दादाजी बल्की, तालुकाध्यक्ष एड. अनंत उंदिरवाडे, महिला आघाडी प्रभारी जया रामटेके, युवा नेते, सुरज कुकूडडकर, अमित नगराळे, छोटू दुर्गे, राहुल फुलझेले, प्रकाश डोर्लीकर, राहुल फुलझेले आदिंनी केेले.
या आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

