खरकाडा येथे गणेशोत्सवानिमित्त “लेक श्रीमंताची” नाटकाचे आयोजन

0
67

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ब्रम्हपुरी खास गणेशोत्सव निमित्ताने तालुक्यातील खरकाडा नवनिर्माण सार्वजनिक गणेश मंडळ,खरकाडा यांच्या वतीने गावातील बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी “लेक श्रीमंताची”नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या लेक श्रीमंताची नाटकाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी सहउद्घाटक म्हणून विशाल राखडे ब्रम्हपुरी,तथा प्रेमलाल धोटे ठेकेदार ब्रह्मपुरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जि.एम. बालपांडे. सं.नि.शि. संस्था.रुई, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष नानाजी तुपट, उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून हेमंत सेलोकर, संगिता ढोरे पो.पा, योगेश ढोरे मा.से.सो. अध्यक्ष,ताराचंद पारधी उपसरपंच, प्रफुलजी ठाकरे ग्रा.प.सदस्य, अशोक वाघधरे तं.मु.अध्यक्ष,उत्तम बगमारे, राजेश शिऊरकार,आदी मान्यवर उपस्थित होते.
या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमोदभाऊ चिमुरकर म्हणाले की, गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. लहान मुलांना संगीत, नृत्य, नाटक, कला आणि साहित्य यासह विविध क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम एक व्यासपीठ प्रदान करतात. हे सण विद्यार्थ्यांमध्ये समाजाची भावना निर्माण करण्यास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला उत्तेजन देण्यासही मदत करतात व अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. असे मत त्यांनी व्यक्त केले.
या “लेक श्रीमंताची” नाटकाला गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. यशस्वीतेसाठी नवनिर्माण सार्वजनिक गणेश मंडळ, खरकाडा सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here