जेष्ठ कवी नवनाथ गायकर नवोदितानां मार्गदर्शन करणार
ईगतपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – नाशिक कवीचा सप्टेंबर महिन्याचा मासिक काव्य मेळावा रविवार दि. २२/९ / २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता, नाट्यपरिषद हॉल, कालिदास कला मंदिर, शालिमार,नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती नाशिक कवीचे कार्यवाहक नंदकिशोर ठोंबरे,उपाध्यक्ष यांनी दिली आहे.
नाशिक कवीच्या या काव्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मा.बाळासाहेब मगर,नाशिक हे असणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणुन सुप्रसिद्ध कवी, लेखक तथा व्याख्याते मा.नवनाथ अर्जुन पा. गायकर,ईगतपुरी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी गायकर हे नवोदित कवीनां मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान सदर काव्य मेळावा हा कवी व काव्य रसिकांसाठी खुला असुन सहभागी कवीस सादरीकरणासाठी तीन मिनिटे दिले जातील.सादर करावयाच्या कवितेला विषयाचे बंधन नाही अशीही माहिती ठोंबरे यांनी दिली आहे.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी नाशिक कवीचे कार्याध्यक्ष शरद पुराणिक,कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे,उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी,
सहकार्यवाह किरण मेतकर, गोरख पालवे, सौ. भारती देव
सदस्य अलका कुलकर्णी, स्मिता बनकर,मार्गदर्शक सुभाष सबनीस, अजय बिरारी आदी परिश्रम घेत आहेत.

