जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने श्रमदानातून स्वच्छता उपक्रम

0
106

अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर, दि. 21: ‘सुंदर माझा परिसर, सुंदर माझे कार्यालय’ या संकल्पनेवर आधारीत तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या पुढाकाराने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात श्रमदानातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेमध्ये अधिकारी आणि कर्मचा-यांनी सहभाग घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, व तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात श्रमदानाव्दारे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी सुंदर माझे कार्यालय अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आपल्या कार्यालयाचा परिसर तसेच आपल्या कार्यालयातील बैठक व्यवस्थेच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी, जेणेकरून आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी सर्व अधिकारी / कर्मचा-यांनी केलेल्या कामावर त्यांनी समाधान व्यक्त केले.
सदर मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, तहसीलदार (संगायो) सीमा गजभिये, तहसीलदार (सामान्य) प्रिया कवळे, अधीक्षक पल्लवी आखरे, नायब तहसीलदार राजू धांडे, जितेंद्र गादेवार, गिता उत्तरवार, ज्योती कुचनकर, कनिष्ठ अभियंता श्री. भट्टड यांच्यासह सहायक करमणूक कर अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, चंद्रपूर येथील सर्व कर्मचारी, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here