नागपुर येथे भव्य आदिवासी मेळावा आयोजित संबंधित नियोजन बैठक पार पडली ….
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज दि.२१ सप्टेंबर २०२४ भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी प्रदेश मंडल आदिवासी आघाडी मोर्चा ची शासकीय विश्रामगृह काँम्पलेक्स गडचिरोली येथे आज दिं. २१ सप्टेंबर २०२४ रोज शनिवार ला नागपुर येथील भव्य आदिवासी मेळावा आयोजित संबंधित नियोजन बैठक माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे श्री.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात घेऊन या बैठकीला विस्तृत व आदिवासी समाज बांधवांसाठी व्यापक दृष्टिकोन ठेऊन आदिवासी संघटनेवर उत्कृष्ट मार्गदर्शन यावेळी करत विदर्भातील भाजपा आदिवासी मोर्चा च्या राष्ट्रीय प्रदेश, जिल्हा,मंडल पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा विदर्भ स्तरीय वसंतराव देशपांडे सभागृह,नागपूर येथे २७ सप्टेंबर २०२४ ला होणाऱ्या “”भव्य आदिवासी पदाधिकारी मेळाव्यात”” मोठ्या संख्येने सामील व्हा ! असे आवाहन माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यानी गडचिरोली येथे आयोजित पदाधिकारी बैठकीत केले.
या प्रसंगी बैठकीला प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डाँ.देवराव होळी, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, माजी आमदार डाँ.नामदेव उसेंडी, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा गिता हिंगे डाँ.चंदा कोडवते, डॉ. नितीन कोडवते, भाजपा धानोरा तालुकाध्यक्ष लता पुन्घाटे,गडचिरोली तालुकाध्यक्ष विलासजी भांडेकर, माजी सभापती रंजिता कोडापे, ता.महामंत्री विजय कुमरे, आदिवासी चे नेते रेवनाथ कुसराम,विजय शेडमाके, ओमकार मडावी, पल्लवी बारापाहिंगे, श्रीनिवास, विलास उईके,नामदेव आतला, विजय गेडाम,विजय कुळमेथे, तसेच मोठ्या संख्येनी आदिवासी बांधव,व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

