चंद्रपूर आम आदमी पक्ष युवा आघाडीच्या मागणीला यश
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर – चंद्रपूर – बल्लारशा राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्याच्या पाण्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरत होते, तसेच शिरना-या पाण्यामुळे अनेकांना त्रास सहन करावे लागत होते. याबाबत बाबुपेठ बायपास परिसरातील नागरिकांची आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या कार्यालयात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम आदमी पार्टी तर्फे बांधकाम विभागाला अनेक निवेदन देण्यात आले .त्यानंतर जनतेला सोबत घेऊन आंदोलने करण्यात आले. या आंदोलनाची प्रशासनाला दखल घ्यावी लागली.
आंदोलनामुळे नालीच्या कामाला मंजुरी मिळाली असून आज नालीच्या कामाकरिता बांधकाम विभाग यांच्या टिमने मोजणी करूण जागेची पाहणी केली ४ दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचे सुद्धा संबंधित अधिकारी यांनी म्हटले आहे. याकरिता येथील पिडीत नागरिकांनी आम आदमी पार्टीचे राजु कुडे यांचे आभार मानले.
यावेळेस आपचे जिल्हाध्यक्ष राजु कुडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, युवा संघटनमंत्री मनीष राऊत, शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद शेख, शहर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, आदित्य नंदनवार, अक्षय गोवर्धन, सागर बोबडे, अजय बाथब इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

