माझ्या चारोळीत
माझ्या प्रत्येक चारोळीत
सख्या तुझेच अस्तित्व
शब्द जरी माझे असले
त्या अर्थाला तुझेच पुर्णत्व.,..
माझ्या प्रत्येक चारोळीत
तुझीच कहाणी दडलेली
अश्रुंनी पापण्यांची चादर
दिसे काहीशी भिजलेली…..
माझ्या प्रत्येक चारोळीत
चढवला प्रेमाचा अलंकार
भावनांचा हुंदका दाटून
आनंदाने केला स्विकार….
माझ्या प्रत्येक चारोळीत
असते तुझे समर्पन
काव्य फुलांची माळ
सख्या तुलाच रे अर्पण……
माझ्या प्रत्येक चारोळीत
सख्या तुझाच भास
हृदयाच्या गाभाऱ्यात
फक्त तुझाच सहवास…
कवियत्री सारिका डी गेडाम, चंद्रपूर S@

