अड्याळ (जाणी) येथे गणेशोत्सवाच्या काल्याच्या प्रसंगी प्रमोद चिमुरकर यांची विशेष उपस्थिती

0
69

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ (जाणी) येथे नवयुवक गणेश मंडळ अड्याळ (जाणी) यांच्या गणपती बाप्पाच्या काल्याचे आयोजन करण्यात आले होते. ब्रम्हपुरी तालुक्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. अड्याळ (जाणी) गावात मागील अनेक वर्षांपासून गणेश उत्सव साजरा करण्यात येते. दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी या गणेशोत्वाच्या गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते गोपाल काल्याचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी नेताची पिसे,संतोष पिसे, अविनाश अमृतकर, मोनु साखरकर, जागेश कुरुडकार, नितीन पंधराम, आदेश अमृतकर, बालू साखरकर, रजन रेवाडे, अजय कुरुडकार, तुकाराम पंधराम यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या गोपाल काल्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमोद चिमुरकर म्हणाले की, “गणेशोत्सव हा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील श्रद्धा, भक्ती, आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला समाजातील विविध घटकांना एकत्र आणता येते. आज याच उत्सवाच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन गावाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
गणेश उत्सवाच्या या मंगलमय वातावरणात भक्तांनी गणपती बाप्पाची प्रार्थना केली आणि गोपाल काल्याचा आनंद लुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here