
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर- भद्रावती आम आदमी पक्षाचा भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात यशस्वीरीत्या पार पडला. जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर अध्यक्ष अनिल राम तथा जिल्हा युवा सचिव आदित्य नंदनवार यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात राजू जांभुळे यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी नवीन सदस्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा सचिव राज नगराळे आणि जिल्हा सचिव प्रशांत सिदुरकर, मनीष राऊत युवा संगठन मंत्री, युवा उपाध्यक्ष अनुप तेलतुंबडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये शहर कोषाध्यक्ष सरताज भाई, युवा उपाध्यक्ष सुमित हस्तक, युवा अध्यक्ष रोहन गुज्जेवार यांच्यासह प्रणय इंगोले, सुरज इंगोले, सुमित मोजे, आदित्य खोब्रागडे, आदित्य पारशिवे, अनुप रामटेके, एजाज पठाण, जितू खमणकर, पुरुषोत्तम नंदनवरे, तेजस धुडे, सुरज मेश्राम आणि प्रेम पवार यांचा समावेश होता. याशिवाय अनेक महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या.
सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या यशस्वी कार्यक्रमामुळे आम आदमी पक्षाची भद्रावती आणि चंद्रपूर जिल्ह्यातील उपस्थिती आणखी बळकट झाली असून, पक्षाच्या वाढत्या ताकदीचे हे प्रतीक मानले जात आहे.














