लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करणार.- खा. प्रतिभा धानोरकर

0
125

झरी – जामनी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी झरी-जामणी येथे आयोजित जनता दरबारात केले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून संपुर्ण लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा जिंकन्याचा संकल्प कॉग्रेसच्या आढावा बैठकीत केला होता. त्या अनुषंगाने बैठका, जनता दरबार यासह कामाची भुमीपुजने, लोकार्पणे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुरु केली आहेत. दि. 24 सप्टेंबर रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविणे हे माझे कर्तव्य असून ती समस्या सोडविण्याचा मी संकल्प केला आहे. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात मी जनता दरबार घेणार असून नागरीकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे.

याप्रसंगी मंचावर माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेस तालुकाध्यक्ष आशिष खुलसंगे, संजय खाडे, प्रकाश कासावार, तेजराज बोढे, आवारी व येलेट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर जनता दरबार अनेक नागरीकांच्या समस्यांचे समाधान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. नागरीकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार देखील मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here