गुणवत्ता दर्जा तपासणीसाठी समिती नेमण्याचे निर्देश.
निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार
ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पेयजल पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरून आपण कोट्यावधींचा निधी खेचून आणला. सदर विकास कामांचे कंत्राट घेणारे कंत्राटदार यांनी बहुतांश ठिकाणी विहित कालावधीत कामे पुर्ण केली नसल्याने व बऱ्याच ठिकाणच्या कामाच्या तक्रारी प्राप्त झाल्या. सदर तक्रारींची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना या संदर्भात विशेष समिती मार्फत विकास कामांची चौकशी करून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश आज बैठकीत दिले.
ब्रह्मपुरी येथे ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यांच्या प्रमुख अधिकारी, नळ योजनेचे अभियंते व संबंधित ग्रामपंचायतीच ग्रामसेवक यांचा आढावा घेत निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या कंत्राटदारांना गुणवत्ता दर्जापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील वन जमिनीवरील अतिक्रमण व नागरिकांना जमिनीचे पट्टे या प्रलंबित प्रकरणावर विस्तृत चर्चा केली. याप्रसंगी प्रामुख्याने चिमुर उपविभागीय अधिकारी गाडगे, जि.प.पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता बोहरे, ब्रम्हपूरी तहसीलदार सतीश मासाळ, सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, जिल्हा काँग्रेस सचिव विलास विखार, सरपंच संघटनेने अध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे तसेच संबंधित विभागाचे सर्व अधिकारी शाखा अभियंता ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक उपस्थित होते.

