अश्विनी कोटमे महिला जिल्हा प्रतिनिधी, नाशिक – भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय साहित्य संमेलनात पाठयपुस्तकातील कवयित्री,साहित्यिका सुमतीताई पवार आणि जेष्ठ कवी चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
योगिता पाखले ह्या निवेदिका , व्याख्यात्या, कवयित्री , मुलाखतकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनिय आहे.त्यांना यापूर्वी देखील अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यमाचे आयोजन गुजरात राज्यातील वलसाड मधील भाग्योदय साहित्यिक समूहाच्या संस्थापिका/ अध्यक्ष भाग्यश्री बागड यांनी केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 30 लोकांना सन्मानित करण्यात आले .हा कार्यक्रम नाशिक येते माहेरघर मंगल कार्यालयात मोठया उत्साहात संपन्न झाला.
पुरस्कार वितरणाबरोबर बहारदार कमी संमेलन देखील येथे गाजले.70 कवींनी आपल्या कविता सादर केल्या.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अमोल चिने यांनी तर पुरस्कार वितरण सोहळ्याचे खुमासदार ,रंगतदार सूत्रसंचालन योगिता पाखले यांनी केले आणि रसिकांची मने जिंकली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक प्रदीप बडदे ,राकेश बागड यांनी विशेष मेहनत घेतली.

