आमदार आशुतोष दादा काळे यांच्या उपस्थितीत
कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख – शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत संकुल गौतमनगर यांच्या वतीने आयोजित ‘कर्मवीर जयंती सोहळा’ आज आमदार मा. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार मा. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते मा. प्रशांत खामकर यांनी यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर अण्णांच्या विचारांवर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी रयत संकुलातील स्कुल कमिटी सदस्य, प्राचार्य, मुख्याध्यापक, रयतसेवक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

