धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार ९५२७७९९३०४ – धुळे आज दिनांक २५/०९/२०२४ पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी अचानक आपल्या मोठ्या फौजफाठ्यासह शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान व रोहिणी गावादरम्यान छापा टाकत गांजा शेती करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. पोलीसांनी गांजाची लाखो रूपयांची रोपे येथे शोधली असून सगळा माल ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे परिसरातील गांजा उत्पादकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान व रोहिणी गावादरम्यान आज सकाळी छापा घालून जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पथकाने गांजाची शेती उघडकीस आणली आहे. ड्रोनच्या सहायख्याने गांजा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र पाहणे व त्याचे मूल्यमापन करण्याचे काम लागलीच हाती घेण्यात आले असून या प्रकरणी रोहिणी (ता. शिरपूर) येथील चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत बेकायदेशीरपणे लागवड झालेला लाखो रूपये किंतीचा गांजा जप्त करण्यासाठीधी योजना आखण्यात येत आहे.पोलीसांनी याप्रकरणी सुरज कालूसिंग पावरा, रोहित सुभाराम पवारा, समीर बळीराम पावरा व ससलाल हजारा पावरा सर्व रा. रोहिणी (ता. शिरपूर) यांना ताब्यात घेतले आहे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा खात्मा करण्याच्या उद्देशाने विविध कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यामध्ये बेकायदेशीरपणे चालणाऱ्या धंद्यांवर छापा घालण्यात येत असून आज सकाळी अशीच कारवाई शिरपूर तालुक्यात करण्यात आली आहे मोठ्या पोलीस फौजेसहअधिक्षक धिवरे यांनी आज शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान व रोहिणी गावादरम्यान छापेघालून केली. या भागात बहुतेक ठिकाणी वन जमीनीवर शेती केली जाते. तूर व कापूस लागवड झाल्याचे दिसत असले तरी अशा पिकांआड गांजाची बेमालूमपणे लागवड केली जाते. असे अनेकदा उघडझाले आहे यामुळे अधिक्षक धिवरे यांनी या भागात आपले लक्ष केंद्रीत केले होते. बेकायदेशीरपणे लागवड झालेले अंतर्गत पिक फोफावल्यानंतर आज कारवाई करण्यात आली.

