ग्रामस्थाच्या सहभागाने एक झाड आईच्या नावे उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

0
56

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. २५ सप्टेंबर २०२४ ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात “स्वच्छता ही सेवा” उपक्रम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबवण्यात आहे. या उपक्रमांतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून एक झाड आईच्या नावे उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामस्थाच्या सहभागाने वृक्षारोपण करण्यात आले आहे.

श्रमदानातून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, स्वच्छता प्रतिज्ञा, सफाई मित्र शिबिर, एक झाड आईच्या नावे हे उपक्रम गावापातळीवर सुरू आहेत. स्वच्छता ही सेवा या मोहिमेत गावकरी, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयातील युवक- युवती यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन स्वच्छता व पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here