प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर :- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांचे वाहतुक व कामगारांना न्याय हक्क मिळवून देवून जास्तीत जास्त सभासद बनविण्याचे निर्देशानुसार चंद्रपुरातील तुकुम टैक्सी स्टैंड शाखेचे उदघाटन करण्यात आले.
सदर चंद्रपुरातील तुकुम टैक्सी स्टैंड शाखेचे उदघाटन शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांच्या शुभ हस्ते करुन वाहतुक कामगार हक्क व संघटनेसंदर्भात मार्गदर्शन करित उपस्थितांना मिठाई वाटप करुन उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी सदर कार्यक्रमाला शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष दिपक कामतवार, वाहतुक चंद्रपुर महानगर अध्यक्ष निलेश गुजर, वाहतुक चंद्रपुर महानगर उपाध्यक्ष सुहास बटाले, तालुका विभाग अध्यक्ष अजय यादव, शाखा अध्यक्ष रीतिक बीसेन, उपाध्यक्ष आदित्य गुजरकर,सचिव अमोल सारवे, सहसचिव आशिष अगडे, सदस्य रज्जत ठाकूर, राम चौहान, कृष्णा धुमने, दिनू गोमस्वामी, राहुल अमगे, गौतम पिल्लेवान, अंकुश कुडे कामगार व शिवसैनिकांची प्रमुख उपस्थिती होती.

