प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नेर (यवतमाळ)- महाराष्ट्र राज्य किसान सभा यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने शेतमाल आधारभाव परिषदेचे आयोजन फकिरजी महाराज संस्थान धनज माणिकवाडा येथे संपन्न झाले. त्यावेळी परिषदेचे मार्गदर्शक कॉ. अशोक सोनारकर (राज्य सचिव किसान सभा,अमरावती) कॉ. सुनिल मेटकर ( राज्य कौंसिल सदस्य,भाकप, अमरावती ) सतिश काळे (धरणग्रस्ताचे नेते,नेर),दिग्रस विधानसभा मतदार संघाचे भाकप उमेदवार कॉ.लक्ष्मणराव खंडारे,ज्येष्ट नेते कॉ.पि.जी.गावंडे,दिग्रस यांच्या प्रमुख उपस्थितीत. शेकडो शेतकऱ्यांच्या साक्षीने शेतमाल आदरभाव परिषद संपन्न झाली.चालु हंगामात अती पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अजुनही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. पिकाची वाढ खुंटली अनेकांच्या शेत्या पाण्यात बुडाल्या आहे. पिक पाहणीचे आदेश मुख्यंमंत्र्यांनी महसुल अधिकाऱ्यांना दिले.कदाचित पिक पाहणी होईल परंतु मागील वर्षांचा पिक विमा अनेकांना मिळाला नाही. किसान सभेने तगादा लावून व न्यायालयात धाव घेवून बऱ्याच जिल्ह्यात पिक विमा मिळवून घेतला.
मागील वर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेला शेत माल हमी भावात न गेल्याने सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५००० रु देवू केले आहे. केंद्र सरकारने शेती मालाची हमी आधार’ भाव जाहिर केला असून कापूस ७१२८ सोयाबीन ४८२५, तुर ८१५०, ज्वारी ३३१५ व इतर शेतमालाचा भाव जाहीर केला आहे. दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारच्या शेती मालाचे हमी भावाचे धोरणाचे विरोधात देशभरात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर बसून आंदोलन केले व अजुनही संघर्ष सुरु आहे, असे प्रतिपादन राज्यसचिव किसान सभा अशोक सोनारकर यांनी केले.शेती धंद्यावर अतोनात खर्च व नैसर्गिक आपत्ती नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांना शेती धंदा नको होत चाललेला आहे. भांडवली अर्थव्यवस्थेच्या शोषणाविरुद्ध शेतकऱ्यांनी संघटीत लढा उभारल्या शिवाय शेतकऱ्या समोर पर्याय नाही आणि म्हणून शेतकऱ्यांनी किसान सभेच्या झेंड्या खाली संघटीत होवून लढा करण्याचे आवाहन परिषदेचे प्रमुख वक्ते काँग्रेस सुनील मेटकर यांनी केले.यावेळी शेकडो शेतकरी परिषदेला उपस्थित राहुन किसान सभेत प्रवेश घेतला.परिषदेची प्रस्तावना राज्य कौंसिल सदस्य कॉ.दिपक माहुरे यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सचिव कॉ.गुलाबराव उमरतकर यांनी केले. यशस्वीतेसाठी कॉ.पुरुषोतम पिंगळे, सुरज मोने, एम. जी. गावडे, कॉ. प्रदिप नजले विलराव मडावी, राजु डहाके, विपक डहाके, मुसारी गुरुजी , रामदासजी चूटे, भानुदासजी भावणे, विश्वर काळे, नरेंद्र गोळे, पांडुरंगजी भगत अनिल राऊत, अजय आकर प्रमोद जी, रतन ओल्हे, रवि रखाकरे, सचिन ओकटे, राजेंद्र तावडे दिवाकर पूरे महदे सर यांनी अथक प्रयत्न केले.

