नांदेड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वाहन चालक, कामगारांच्या सुख आणि हितासाठी सतत कार्यरत असलेली अनैशा वाहन चालक कामगार संघटनेची धनेगाव जिल्हा नांदेड येथे सभा घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने आता नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून शेख अय्युब शेख समद यांची अध्यक्षपदी तसेच अहमद खान गौस खान पठाण यांची जिल्हा महासचिव आणि महेश गणपतराव देशमुख यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे यांनी केली.
मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील वाहन चालक कामगार वेगवेगळ्या प्रकारच्या वाहन चालकांच्या नानाविध समस्याला वैयक्तिक स्तरावर तोंड देत होते. वैयक्तिक स्तरावरील त्यांच्या समस्यांची कोणीही दखल घेत नसल्याने येथील वाहन चालक कामगार योग्य अशा वाहन चालक संघटनेच्या शोधात होते. यांना अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांच्या रूपाने वाहन चालकांचे सक्षम आणि धडाडीचे नेतृत्व मिळाले आहे.
नांदेड जिल्हा येथील वाहन चालकांनी धनेगाव, नांदेड येथे नुकतीच वाहन चालकांची सभा बोलावली होती. या सभेला अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. यांत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे, संघटनेचे सल्लागार अशोककुमार उमरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अनंताभाऊ रामटेके, जिल्हा सचिव उमाकांत वाघमारे व सचिव संतोष वाघमारे इत्यादींनी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली.
धनेगाव, नांदेड येथे झालेल्या सभेनंतर अनैशा वाहन चालक कामगार संघटना जिल्हा नांदेड यांची कार्यकारिणी गठित करण्यात आली असून नांदेड जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महासचिव आणि जिल्हा संघटक ही पदे जाहीर करण्यात आली. टाळ्यांच्या कडकडाटात नांदेड जिल्हा अध्यक्ष शेख अय्युब शेख समद, जिल्हा महासचिव अहमद खान गौस खान पठाण आणि जिल्हा संघटक म्हणून महेश गणपतराव देशमुख यांच्या नियुक्तीचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख वसीम, शेख अय्युबभाई, अहमद खान, महेश देशमुख, लखन जोंधळे, महेश राठी, शेख अफरोज, शेख साजीदभाई, अब्दुल वाशीदभाई, इरफान खान, शेख अजीजभाई, अज्जूभाई, ईमरान खान, शेख सलीम, शेख वहाब, शेख अहमद, फिरोज, ऐजाज, सिराज, एम. कलीम, इमरान, युनूस, मोहम्मद कलीम, अफरोज, इनावतुल्ला, खलील, युनूस, अक्रम, आयुब, इरफान, मतीन, जावेद, सलमान, साजीद, सद्दाम, शफीज, वाजिद, सय्यद शेरू, शेख आमेर इत्यादींनी मोलाचे योगदान दिले.

