राहता प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भीम सक्ती संघटनेचे पदाधिकारी भाऊसाहेब कोंडी राम साठे यांचे सह त्यांचें कुटुंबातील सदस्य सखाराम कोंडी राम साठे; कोंडी राम राघुजी साठे, भामाबाई कोंडिराम साठे.; सर्व राहणार वांबोरी. ता.राहुरी.जिल्हा.अहमदनगर.या सर्वांनी मिळून कट करून संगनमताने दी.12/9/2024 रोजी श्री ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे हे आजारी असतानाही या त्यांच्या चारही नातेवाईकांनी स्वतःचे फायदयाकरिता बनसोडे यांचे कडून भीम सक्ती या पदाचा गैर वापर करून व राजकीय दबाव तंत्राचा अवलंब करून.जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने इच्छे विरुद्ध राहता येथे नोटरी ( समझोता पत्र) करून घेतली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की. मूळचे साकुरी. ता राहता. जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असलेले श्री ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांचे मालकीची राहुरी फॅक्टरी येथील दुमजली इमारत श्री भाऊसाहेब कोंडी राम साठे यांनी प्रेरणा कला क्रीडा.सांस्कृतिक मंडळ संचलित डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह चालविणे करिता दीं.1/12/2009 ते दीं 28/5/2011 या कालावधीत भाड्याने घेतली . सदरची इमारत त्यांनी शाशंन मान्यता मिळेपर्यंत वापरली. व मान्यता मिळताच सदरचे वसतिगृह हे त्यांनी आपले राहते घरी वांबोरी येथे स्थलांतरीत करून शासनाकडून भाडे वसूल केले जात आहे. दरम्यानचे काळात इमारत भाडे व नुकसान भरपाई पोटी 7 लाख 60.000 हजार रु इतके भाडे मिळावे यासाठी श्री. बनसोडे यांनी संबंधितांकडे वारंवार विनंत्या करूनही यश आले नाही..या बाबत तडजोड करण्याकरिता सदरचे हे चारही इसम दि.7/7/2024 रोजी श्री बनसोडे यांचे राहते घरी साकुरी येथे आले. दरम्यानचे काळात भाडे देणेघेणे चर्चा चालू असताना चर्चेचे रुपांतर वादावादी त होऊन या चारही नातेवाईकांनी बनसोडे यांस जीवघेणी मारहाण करून त्यांनी तेथून पलायन केले. बनसोडे यांनी वेळीच राहता पोलिस स्टेशन येथे एन सी आर 533/2024 प्रमाणे गुन्हा नोंद केला. व रहाता ग्रामीण रुग्णालयात एल एम सी नंबर 35/2024 ने उपचार घेऊन राहता येथील मे दंडाधिकारी साहेब यांचे कोर्टात SCC क्री.के नंबर 1031/2024 नुसार रीतसर गुन्हा नोंदवला.म्हणून सदरची ही केस मागे घ्यावी व वसतिगृह भाडे पोटी आम्ही देऊ ती तुटपुंजी रक्कम मान्य करावी.पुन्हा आमचे वसतिगृहाबाबत व आमचे वर कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार नाही. राहता न्यायालयात दाखल केलेली केस मी स्वतः होऊन काढून घेईल.या व अशा प्रकारचा मजकूर त्यांची इच्छा नसताना ही जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने इच्छे विरुद्ध राहता येथे 12/9/2024 रोजी नोटरी (समझोता पत्र) करून घेतली आहे . अश्या प्रकारचा हा जबरदस्तीचा करार नामा बनसोडे यांचेवर बंधन कारक नसून तो त्यांना मान्य नाही.असे या जाहीर नोटिशी ने भाऊसाहेब कोंडी राम साठे व संबंधितांना सूचित करण्यात येत आहे.या बाबत गरज पडलीच तर श्री बनसोडे हे योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून न्याय मिळावा या मागणीसाठी प्रयत्नशील आहेत. दि.12/9,/2024 रोजी रहाता येथे झालेला करार (समझोता पत्र) श्री बनसोडे यांचेवर बंधन कारक नसून सदर चा करार हा रद्द समजण्यात यावा.या बाबत भाऊसाहेब साठे व संबंधितांची काही तक्रार अथवा विरोध असल्यास सदरची ही जाहीर नोटीस प्रशिद्ध झाल्यापासून 7 दिवसाचे आत राहता येथील मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब राहता यांचे कोर्टात आपले रीतसर म्हणणे मांडावे.असे या जाहीर नोटीशिंने सूचित करण्यात येत आहे… त्या नंतर या प्रकरणी आपले काही एक म्हणणे नाही.असे समजून गरज पडली तर वसतिगृहा बाबत वआपले विरुद्ध पुढील कारवाई करण्यात येईल असे या जाहिर नोटीशिने कळविण्यात येत आहे.

