परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – परळी तालुका व शहरातील तीन वर्षा पेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्याच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या निपक्षपाती व मोकळ्या वातावरणात व्हाव्यात . त्यामुळे स्थानिक चे अधिकारी व तीन पेक्षा जास्त वर्ष कार्यकाळ झालेले अधिकारी हे हुकूमशाही व स्थानिक च्या नेतृत्वाच्या म्हणण्यानुसार वागतात व व मतदारावर ही दबाव दहशत निर्माण होते त्यामुळे सदरील निवडणुका स्वच्छ व निपक्षपाती न होता दबाव खाली होतात त्यामुळे तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झालेले अधिकारी तात्काळ बदल्या करण्यात याव्यात व स्थानिक च्या अधिकाऱ्यांची ही तात्काळ बदली करण्यात याव्यात अशी ही मागणी मुख्य निवडणूक आयुक्त केंद्रीय कार्यालय मुख्य निवडणूक कार्यालय महाराष्ट्र निवडणूक अधिकारी जिल्हा कार्यालय इत्यादींनाही निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केली आहे

