कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख 9860910063 – कोपरगाव तालुक्यातील भोजडे नं. 2 सोसायटीची वार्षिक सभा व आदर्श सभासद पुरस्कार वितरण सोहळा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थित मध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
भोजडे गाव माझ्या अत्यंत प्रेमाचं, गावच्या पुढील 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी चेअरमन आणि सरपंच यांनी तयार केलेल्या एकूण 75 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास तात्काळ मंजुरी – खा.वाकचौरे प्रामाणिक कर्म करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ.. सहकारातून सेवा करत शुद्ध हेतूने काम करणाऱ्या संस्थेची भरभराट होणार – महंत राजेश्वरगिरीजी महाराज सभासदांच्या बळावर संस्था प्रगतीपथावर.. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक सभासदास एक भेटवस्तू देणार – चेअरमन मुकुंद सिनगर भोजडे गाव जन्मभूमी असल्याचा सार्थ अभिमान.. अंगणवाडीतील सुमारे 150 चिमुकल्या विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप केल्याचं समाधान – संचालक दीपक धट, भोजडे सोसायटी आणि भोजडे ग्रामपंचायत गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू… गावाने आधुनिक ग्रुप शेती करण्यावर भर द्यावा – उपायुक्त चंद्रकांत मंचरे कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त आदरणीय पुरुषोत्तम पगारे सर यांनी मोलाचं मार्गदर्शन करत संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच सुधाकर वादे, उपसरपंच सलीम जी शेख, चेअरमन रंगनाथ नाना सिनगर, भाऊसाहेब पाटील सिनगर, संभाजी पाटील सिनगर, अनंत तात्या सिनगर, साहेबराव पाटील सिनगर यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, सभासद, हितचिंतक, पत्रकार बंधू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

