prabodhini news logo
Home कविता आजची कविता – आयुष्याच्या वळणावर

आजची कविता – आयुष्याच्या वळणावर

0
168

शब्द माझे झाले गाणे गाण्याला ज्या तुझे होते स्वर
आठवते का गीत जुने ते आयुष्याच्या या वळणावर

चल एकदा आपण पुन्हा भेटुयात त्या वळणावर
जेथून दो वाटा जात होत्या वेगळ्या दो रस्त्यावर

भेटायचे का आपण पुन्हा तसेच त्या जोड रस्त्यावर
सोडून पाय पुन्हा बसूयात त्या ओढ्याच्या काठावर

आपले स्वप्नांचे होते मंदिर ज्या ओढ्याच्या काठावर
बघुया आहे का बहर अजुन तिथल्या गुलमोहरावर

भिजल्या डोळ्यांना साक्ष होता तो जो गुलमोहर
शोधू काही जुनी भेटीची चिन्हे पुन्हा त्या जागेवर

पुन्हा न भेटण्याचे ठरविले होते आपण ज्या जागेवर
चल एकदा भेटू आपण पुन्हा दूरवर जाण्या अगोदर

कवी अविनाश गडवे (अवती), नाशिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here