दिलेस मज एकदा
फुल चाफ्याचे सुंदर …
साजणा! सहवास तुझा
लाभावा मज निरंतर
म्हणून जपुन ठेवते
ते फुल चाफ्याचे
पुस्तकात माझ्या सत्वर
पाकळ्या पाकळ्यां वरचे
मोजत राहते श्वास
अंतरात माझ्या निरंतर …
त्या श्वासांचे होते
अत्तर , गंध येतो
मग देहास माझ्या
तुझ्या त्या प्रेमखुणा
बहरून येतो गुलमोहर…..
मनात माझ्या गंधाळते
त्या पहिल्या वहिल्या
भेटीचे सुगंधी अत्तर
गंधात रंगते काया
मोहक दरवळ पसरतो
खोल काळजात माझ्या…
हवी कशाला सौंदर्यलेणी
या चेहऱ्यावर माझ्या
तुझ्यातली मीच नंतर
हळूहळू दरवळत राहते
अंतरात तुझ्या माझ्या.
कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर, गोवा

