कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. ९८६०९१००६३ – कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल धामोरी कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा ) यांची जयंती ३० सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य अरुण चंद्रे तसेच धामोरी स्कूल कमिटी चेअरमन चंद्रशेखर कुलकर्णी साहेब तसेच न्यू इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक, धामोरी येथील ग्रामस्थ व मान्यवर मायगाव देवी येथील ग्रामस्थ सर्व शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या उत्साहात सहभागी होते. जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस कोपरगाव पोलीस स्टेशनचे पीआय कोळी यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात आपण कुठल्या स्पर्धा परीक्षा द्याव्या अभ्यास कसा करावा आजच्या जगामध्ये मोबाईल ला किती महत्त्व द्यावे याविषयी प्रोत्साहन पर भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह निर्माण केला कार्यक्रमाला गावातील नारायण पाटील मांजरे,ज्ञानदेव पाटील मांजरे सुनील दरेकर, रामराव माळी, सुदाम गाडे, कैलास आप्पा माळी, बारे, सुनील मांजरे इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला.

