प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर- आज दि 29 सप्टेंबर रोजी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनिता नरेंद्र पंत बोबडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनातून लाभलेल्या बहिणाबाई होस्टेल हनुमान नगर तुकूम चंद्रपूर येथील 35 निराधार मुलांना स्व,सौ,प्रभाताई प्रल्हादराव पडगीलवार स्नेहनगर यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री उमेश राव व सौ प्रणिता पडगीलवार यांचे मार्फत टॉवेल तर जगू या थोडं माणुसकी साठीउपक्रमाचे संयोजक विवेक पोतनूरवार यांच्या कुशल मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे व आघोळीची साबण वाटप करण्यात आली,या वेळी ग्रुप सदस्य व योगदाते महेश व स्मिता येरावार, रेखा चंद्रशेखर राव मैलारपवार, उमेश व प्रणिता पडगीलवार, किरण व कु रिद्धी अभय केशट्टीवार यांचा प्रामुख्याने सहभाग लाभला,सामाजिक बांधिलकी जोपासून विवेक पोतनूरवार यांनी जगू या थोडं माणुसकी साठी हा आपल्या आप्त नातेवाईकाच्या सहकार्याने ग्रुप सुरू केला,यात गरीब विद्यार्थ्यांना शु,नोट बुक पुस्तके घेऊन देणे,भुकेल्यानं अन्न देणे,दवाखान्यात भरती असहायय रुग्णास औषधी घेऊन देणे अश्या अनेक बाबीचा समावेश असून यात बहुतांश आप्त नातेवाईक मदतीचा हात भार देत असतात, आज सर्व प्रथम शिक्षिका अनिता बोबडे यांनी सर्वांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत केलं,व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली,

