विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर – जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या ब्रिदाप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक उपक्रमातून विविध जनसेवा कार्य अभियाने राबविली. याच उदांत हेतूने सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव (गन्ना)येथे आयोजित शिबीरा अंतर्गत नुकतेच मोफत डोळे तपासणी करून गरजू ७२५ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्र विकासासह क्षेत्रातील जनतेच्या आरोग्याची ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काळजी घेत आजवर विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून यातून नागरिकांना मोफत शस्त्रक्रिया, व अन्य आजारांवर मात करण्यासाठी सहकार्य केले. यात कर्करोग, नेत्ररोग, हृदयाला छिद्र, स्वादुपिंड विकार, जठराचे रोग, हृदयरोग तसेच इतर गंभीर आजारांचा समावेश आहे. केवळ राजकारणा पुरतेच लोकप्रतिनिधी नसून राजकारणा पलीकडेही समाजकारण आणि समाजसेवा याची जाण ठेवणारा सच्चा जनसेवक म्हणून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे.
सध्या विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण वृध्द रुग्णांना दिलासा देणे हेतू विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातून सिंदेवाही तालुक्यातील कळंमगाव (गन्ना) येथे नुकतेच मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले. आयोजित शिबिराचा हजारोंच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. यातून ७२५ गरजूंना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा कृउबा समीती सभापति रमाकांत लोधे, कृउबा समिती उपसभापति दादाजी चौके, काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुराव गेडाम, संचालक जानिक वाघमारे, रवींद्र मेश्राम, राहूल मगरे, विलास मेश्राम, तुळशीदास गेडाम, अरविंद चौके, सुधाकर धरत, वामनराव मगरे, दादाजी बारेकर, जनसंपर्क कार्यालयं प्रमुखं अशोक सहारे उपस्थित होते.

