भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश….!
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर – येन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे,जिल्हा युवक काँग्रेसचे माजी महासचिव सागर खोब्रागडे तसेच गिरगाव तं.मु.स.चे अध्यक्ष तथा माजी ग्रा.पं.सदस्य राकेश खोब्रागडे या दोन्ही बंधूंनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या विकशील कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.
खोब्रागडे बंधू हे नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील असून त्यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस मध्ये कामं केले आहे.ते स्थानिक काँग्रेस नेते विनोद बोरकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते,बोरकर यांना हा एक मोठा धक्का समजला जात आहे.
सागर खोब्रागडे हे युवक काँग्रेस मध्ये असतांना अनेक मोठे पदे त्यांनी भूषविली आणि आपली झाप पक्षामध्ये त्यांनी सोडली होती,परंतु काँग्रेस मधील काही स्व मर्जीतील नेत्यांमुळे आपण पक्ष सोडला अशी कबुली सागर यांनी दिली.
आता या दोन्ही बंधूंचा फायदा भाजपा साठी कसा होणार हे बघण्यासारखं आहे.

