दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर– स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात दि. 23 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सदभावना पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विधी महाविदयालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे दर वर्षी सदभावना पंधरवाडा साजरा केला जातो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रम या पंधरा दिवसात आयोजित करण्यात आले.
महाविदयालयातील रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. सरोज कुमार दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरतील असे कार्यक्रम आणि उपक्रम राबविणे या सदभावना पंधरावाडा आयोजना मागचा मुख्य उद्देश प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी साध्य करण्याचा मानस या प्रसंगी व्यक्त केला. या उपक्रमा अंतर्गत विधी महाविद्यालय येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. चंद्रपूर शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 35 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी रक्तगट तपासणी करून घेतली. या उपक्रमा चा भाग म्हणून चंद्रपूरातील प्रसिद्ध विधिज्ञ् ऍड. फरहाद बैग यांनी व्यसनधिनता आणि त्याचे समाजावर होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. चंद्रपूरातील मनोरुग्ण तज्ञ् डॉ. किरण देशपांडे यांनी बलात्कार करणाऱ्या गुन्हगार यांची मानसिक सामाजिक स्थिती आणि वाढते मनोरुग्ण या विषयावर सविस्तर व्याख्यायन केले. चंद्रपूरातील सायबर सेल चे पोलीस अधिकारी राहुल पोंडे आणि मुजावार अली यांनी आज वाढत्या सायबर गुन्हे आणि त्या पासून सुरक्षित राहण्या साठी घ्यवायची काळजी या वर प्रदीर्घ मार्गदर्शन प्रदान केले. या उपक्रमा सह अनेक विद्यार्थी उपयोगी उपक्रम रा. से. यो विभागा तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि रा से यो स्वयं सेवकांनी मिठ्या प्रमाणात लाभ घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांच्या मार्गदर्शनाखली सर्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने अथक परिश्रम घेतले.

