पुणे विशेष जिल्हा प्रतिनिधी प्रियंका मेश्राम – राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची आज पुणे येथे सकारात्मक भेट झाली.
भेटीत अण्णासाहेब कटारे यांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित असलेल्या मतदारसंघाचा प्रस्ताव सुप्रिया सुळे यांच्या समोर सादर करून सकारात्मक चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण या सर्व विभागातील विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे अण्णासाहेब कटारे यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितले.
लवकरच पुढील बैठक होणार असून सदरच्या बैठकीत काही निर्णय देखील घेतले जाणार असल्याचे समजते.
सदर प्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष सचिन साबळे, महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिनभाऊ नांगरे, युवा नेतृत्व बिपिनभाई कटारे, युवा नेते प्रशांत कटारे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल मोहिते, तळेगाव दाभाडे अध्यक्ष सुनील करंजे, तळेगाव दाभाडे उपाध्यक्ष अक्षय वाघमारे, कुणाल चव्हाण, आदी उपस्थित होते.

