
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर – श्री. कन्यका महिला मंडळा,चंद्रपूर कडून नेहमीच महिलांसाठी उपयुक्त नवनविन उपक्रम घेण्यात येतात.अध्यक्षा श्रध्दा मुनगंटीवार, सेक्रेटरी लता बोनगीरवार व इतर पदाधिकारी यांना याचे श्रेय जाते. वरील प्रोजेक्ट मेघा कुल्लरवार व हॉस्पीटल वार्ड गृप चंद्रपूर यांनी अत्यंत सुंदररित्या घेतला .
प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसाव असे वाटते.परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःला वेळ देता येत नाही.यासाठी कमी वेळात स्वतःचा मेकअप स्वत:ला कसा करता येईल याचे सुंदर डेमो प्रसिद्ध ब्युटीशियन सौ ममता नगराळे यांनी दिला. HD मेकअप, वॉटरप्रूफ मेकअप एअर ब्रश मेकअप याची सविस्तर अशी माहिती कमी वेळात समजावून सांगितली तसेच पितृपक्षाचे औचित्य साधून पितृदोष मुक्तीची युक्ती पूर्वजांचे खरेच श्राद्ध कसे करावे याबद्दल डॉ. सुचिता देशमुख यांनी अतिशय सोप्या भाषेत महत्त्व समजावून सांगितले.
राजेश्वरी उमेश कोंडावार यांचा शृंगेरी येथे श्रीमद् भगवद्गीता परीक्षा प्रथम श्रेणीत उतीर्ण झाल्याबद्दल कन्यका महिला मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
सूत्र संचालनाची भूमिका अर्चना पालारपवार व अंजली बंडावार दोघींनी पार पाडली. वन मिनिट गेम सुरभी मामीडवार व पूजा मामीडवार यांनी घेतली.
या कार्यक्रमाला राधा उपगन्लावार,वर्षा ताटीवार वर्षा कोतपल्लीवार, शुभांगी माडूरवार, भावना तन्नीरवार, वैशाली पालारपवार, निता माधमशेट्टीवार ह्या कार्यक्रमात उपस्थित होत्या असे राजश्री झुलकंठीवार कळवतात.














