सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर – जागतिक वृध्द दिनानिमित्त विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर तर्फे डेबू सावली वृध्दाश्रम येथे विधी सेवा प्राधिकरण तर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांच्या मार्गदर्शनात सचिव मा. सुमित जोशी यांच्या परिश्रमातून वृद्धांना संजय गांधी निराधार योजना अनुदान प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. समृद्धी भीष्म होत्या .तर प्रमुख पाहुणे विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर चे सचिव मा. सुमित जोशी, नायब तहसिलदार सचिन खंडाळे, स्टेट बँक ऑफ इंडिया चे ब्रांच मॅनेजर मनोज काठवाथे, डेबू सावली वृध्दाश्रम चे संस्थापक सुभाष शिंदे, अधिवक्ता महेंद्र असरेट ई उपस्थित होते.
याकार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष शिंदे, सूत्रसंचालन धनंजय तावाडे यांनी तर आभार प्रदर्शन सुधा मुडे यांनी केले .

