साकोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शिलवंत बहुुद्देशिय विकास संस्था, भंडारा द्वारा संचलित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोली येथे 2 ऑक्टोबर 2024 रोज बुधवार ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस द्वीप प्रज्वलन, प्रतिमेचे पूजन व अतिथींचे स्वागत स्टाफ व रुग्ण मित्राकडून करण्यात आले. गांधी जयंती निमित्त व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. उषा घोडेस्वार (प्रकल्प संचालिका) यांनी केलं. केशव तिरपुडे, अधिवकत्याचे कारकून न्यायालय साकोली यांनी व्यसनमुक्ती बाबत प्रबोधन केले. व्यसनामुळे कुटुंब व समाजात प्रतिष्ठा कशी नाश पावत आहे असे मा. गंगाधर धुवाधपारे (संस्थेचे अध्यक्ष) यांनी सांगितले. काही रुग्ण मित्रांनी आपले मनोगत व्यक्त करून आपण व्यसन करण्याचा पश्चाताप व्यक्त केला. अध्यक्षीय भाषण श्री. महेश शिवणकर सर, सचिव देशप्रेमी सेवा संस्था, साकोली यांनी केले आहे. स्वच्छ्ता, आरोग्य व व्यसनमुक्त जीवन असा संदेश देऊन केंद्राचे व्यवस्थापक शिलवंत घोडेस्वार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष गंगाधर धुवाधपारे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संस्थेचे कोषाध्यक्ष विवेक खोब्रागडे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
केंद्राचे कर्मचारी वंदना चिमणकर (समुपदेशक), हेमेंद्र धकाते, अमीर वालदे(सेक्युरिटी गार्ड) जयश्री चिमणकर (नर्स), शशिकला बागडकर, ऋषी येरणे, संदीप इलमकर, राकेश शिवणकर, चेतन साखरे, भूमेश्वर बाभरे, वनिता बहेकार इत्यादी उपस्थित होते.

